बदाम कुकीज रेसिपी

साहित्य

  • २ कप मैदा
  • दीड टीस्पून बेकिंग पावडर
  • १ कप बदाम
  • १ कप लोणी
  • १ कप पिठी साखर
  • २ टेबलस्पून दूध
  • थोडे तूप

कृती

  • मैदा आणि बेकिंग पावडर एकत्र करून चाळणीने गाळून घ्या
  • २०-२५ बदाम बाजूला काढून कोमट पाण्यात थोडावेळ भिजवा आणि काढून उभे दोन भाग करा
  • उरलेल्या बदामांची पावडर करा
  • मोठ्या पातेल्यात लोणी घेऊन हलके गरम करून वितळवून घ्या आणि साखर घालून छान मिक्स करा
  • आता मैदा घालून खूप वेळ एकसमान मिक्स करा
  • यात बदाम पावडर आणि दूध घालून छान कणिक मळून घ्या
  • अलुमिनियम ट्रे घ्या आणि त्याला तूप लावून ग्रीसिंग करा
  • कणकेचे छोटे छोटे गोळे करून हातावर घ्या आणि मळून शेवटी कुकीजचा आकार द्या आणि वरून अर्धा बदाम चिकटवा
  • कुकीज ट्रे मध्ये ठेवा. दोन कुकीज मध्ये थोडे अंतर ठेवा. भाजल्यावर कुकीज मोठ्या होतात
  • ओव्हन १८० डिग्री ला १० मिनिटे प्रीहीट करून घ्या
  • आता कुकीज चा ट्रे ओव्हन मध्ये ठेवा. ओव्हन कॉन्व्हेक्शन मोड ला ठेवा
  • १५ मिनिटं बेक करा
  • बाहेर काढून कुकीज बघा. कडेने जर लालसर तपकिरी रंग आला असेल तर तुमच्या कुकीज भाजल्या गेल्या आहेत. नसेल तर ५ मिनिट परत बेक करा
  • थंड झाल्यावर ट्रेमधून कुकीज बाहेर काढा आणि सर्व करा

अशा आणखी बेकिंग टिप्स / बेकिंग आयडियाज आणि रेसिपीज साठी जवळील व्हाट्सऍप आयकॉन वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

Leave a Reply